Sunday, May 9, 2010

आई

मला झालेला आनंद ...

पहिलं हसू तुझ्याच ओठांवर फुलवतो...!!!

माझं मन दु:खी असलं ...तर

पहिला अश्रुही तुझ्याच डोळ्यांतुन पडतो...!!!

माझं ध्येय पूर्ण व्हावं ... हा

पहिला ध्यास तुझाच असतो...!!!

मी स्वत:च्या पायांवर उभी रहावी ... म्हणून

पहिला प्रयत्नही तुझाच असतो...!!!

माझ्यासाठी स्वत:च्या इच्छा दाबण्याचा ...

पहिला त्याग तुझाच असतो...!!!

मी यशस्वी झाले की ..

पहिला अभिमानही तुलाच वाटतो...!!!

माझ्याकडून चुक झाली ...तर

पहिला राग तुलाच येतो...!!!

पण नंतर माझ्या पाठीवरून फिरणारा ...

पहिला हातही तुझाच असतो...!!!

माझ्या थरथरत्या पायांना ...

पहिला आधार तुझाच असतो...!!!

म्हणून देवाआधीही माझा

पहिला नमस्कार तुलाच असतो...!!!