Monday, May 3, 2010

"विसावा"

श्रांत झालेले दोन हात,
जेंव्हा एकात एक पाहिले ...
उगाचच काळजात,
काहीतरी हलले...!!!

चेहऱ्यावर सुरकुत्या,
हातावर वळ्या...
पण मिटलेल्या डोळ्यांतुन वाहते,
कुणासाठीतरी अखंड माया...!!!

मुलाने हाकलले,
मुलीने नाकारले ...
त्यांच्यासाठी उपाशी राहून काढलेले,
दिवस तेंव्हा आठवले...!!!



जेवताना थरथरता हात,
ओठापाशीच थांबायचा ...
आईची वेडी माया,
पणाला लावायचा...!!!

भिंतीवरच्या चित्रात पाहून
नंदाचा गोपी (कृष्ण) ...
मनातून वाहू लागायची,
कडू आठवणींची कुपी...!!!

मनाचा असा कोंडमारा,
जेंव्हा असह्य झाला ...
हाती आला तेंव्हा,
विषाचाच प्याला...!!!


दोन अतृप्त जीव जेथून,
अनंताच्या प्रवासाला निघाले होते ...
त्या वृदधालयाचे नाव,
"विसावा"  होते...!!!

2 comments: